“धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच मिळणार, ठाकरेंसोबत फक्त तीन लोकं शिल्लक राहणार”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ठाकरे आणि शिंदे यांच्या याचिकांवरील सुनावणी आणखी लांबणीवर ढकलली आहे. आता येत्या पुढील सुनावणी ही १४ फेब्रुवारी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
यातच १४ फेब्रुवारीपासून सर्व काही प्रेमानं होणार अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे त्या सुनावणीत नेमकी काय होईल, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेंनाच मिळेल, असं आमदार रवी राणा यांनी सांगितलं आहे.
शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांवरील अपात्रतेविषयी पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी होणार आहे. तर आज सांयकाळी निवडणुक आयोग धनुष्यबाणांसदर्भात सुनावणी करणार आहे. यातच धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच मिळणार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत फक्त तीनच माणसं शिल्लक राहणार आहेत.यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब. अशी खोचक टिप्पणी रवी राणा यांनी दिली आहे.
आज सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी वेळी खासदार संजय राऊत, अनिल देसाई, आणि अनिल परब हे देखील उपस्थित होते. तर शिंदे गटातील वकिलांनाकडून निहार ठाकरे उपस्थित होते. तसेच हे प्रकरण आता पाच न्यायाधीश खंडपीठाकडून ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार का? यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
१४ फेब्रुवारीपासून घटनापीठ सलग सुनावणी घेणार आहेत. ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मुख्य न्यायाधीशांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील हे प्रकरण आम्ही ऐकू. असं संजय राऊतांनी म्हटलं. तसेच कोर्टात कपिल सिब्बल यांनी १४ फेब्रुवारी हे वॅलिटाईन डे आहे. शुभ दिवस आहे. त्यावर राऊत म्हणाले की, त्यादिवसापासून सर्व काही प्रेमानं होणार. असं राऊत म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..