भाजपला चितपट करण्यासाठी काँग्रेसची मोठी खेळी ; पक्षानं प्रणिती शिंदेंना दिली नवी जबाबदारी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- निवडणुकीत भाजपला चितपट करण्यासाठी काँग्रेसनं मोठी खेळी खेळली आहे.
सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उफाळून आला आहे.
सर्वोच्च न्यायालयातही याबाबत सुनावणी सुरु आहे. त्यातच यावर्षी कर्नाटकात निवडणुका होणार असल्याने मुख्यमंत्री बोम्मई महाराष्ट्रातील काही राज्यावर दावा करत असल्याचं बोललं जात आहे.
मात्र, याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं (Congress) मोठी खेळी खेळली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) तोंडावर काँग्रेसनं सध्या तयारी सुरू केलीये. काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्षांकडून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना काँग्रेस पक्षाकडून नवीन जबाबदारी सोपवण्यात आलीये.
लोकसभेच्या जागेवर निरीक्षक म्हणून निवड
कर्नाटकातील दावणगिरी लोकसभा मतदारसंघाचे (Davangere Lok Sabha Constituency) निरीक्षक पदाची जबाबदारी आमदार शिंदे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आलीये. यंदा कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक नेत्यांवर कर्नाटकातील लोकसभेच्या जागेवर निरीक्षक म्हणून निवड केलीये. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकांची यादीही जाहीर केली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..