पवार घराण्यात राजकारण! साहेबांचे दोन नातू निवडणुकीच्या रिंगणात तरीपण……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुण्यात असोसिएशनच्या सदस्यपदाची निवडणूक पार पडली. त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
तर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे दोन नातू समोरासमोर उभे राहिले होते. रोहित पवार आणि अभिषेक बोके यांच्यातील लढत थांबविण्यासाठी रविवारी खुद्द शरद पवार यांना मैदानात उतरावे लागले. त्यांच्या प्रयत्नांनंतरही या दोन नातवांमध्ये निवडणूक झाली. तर निवडणुकीमध्ये रोहित पवार यांनी बाजी मारली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये या संघटनेचे अध्यक्षपदही रोहित पवार यांनी मिळविले आहे.
काल (रविवारी) एमसीएची निवडणूक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशच्या स्टेडियममध्ये पार पडली. या निवडणुकीत या वेळेस संलग्न क्लबमधून आमदार रोहित पवार (शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब पवार यांचे नातू) आणि अभिषेक बोके (पवार यांच्या भगिनीचे नातू) यांच्याबरोबरच माजी क्रिकेटपटू शंतनू सुगवेकर आणि सुनील संपतलाल मुथा यांनी अर्ज दाखल केले होते.
अजित पवार यांनी बैठक घेतल्यानंतर यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या गोष्टीत लक्ष्य दिलं. त्यानुसार अभिषेक बोके यांनी माघार घ्यावी, असा आदेश दिला गेला. यासंबधी चर्चेसाठी शंतनू सुगवेकर आणि सुनील संपतलाल मुथा यांनी रोहित पवार यांच्याशी संपर्क साधला; परंतु त्यांनी अनुकूल प्रतिसाद दिला नाही. अखेर रविवारी सकाळी मतदान पार पडले. यामध्ये रोहित पवार विजयी झाले आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..