‘त्या’ वक्तव्याबद्दल अजित पवारांनी मागितली माफी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधानाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. त्यात आता आणखी एका वादाची भर पडली आहे. मात्र यावेळी अजित पवारांनी लगेचच दिलगिरी व्यक्त केली आहे.
विधानभवनात हिवाळी अधिवेशनात बोलताना अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर असा उल्लेख करण्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं होतं. त्यावरुन राज्यभरात निदर्शनेही झाली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र अजित पवारांची पाठराखण केली आहे. पण आता अजित पवारांकडून पुन्हा वादग्रस्त उल्लेख झाला आहे.
पुण्यातल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ माँसाहेब, यांच्याविषयी बोलताना, सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर असा झाला. यावरुन भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी टीका केली.
मात्र, या उल्लेखानंतर लगेचच अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. “पुणे येथील कार्यक्रमात भाषणावेळी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊं माँसाहेब’ या महामानवांचं स्मरण करताना, कर्तृत्व सांगताना बोलण्याच्या ओघात माझ्याकडून ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ ऐवजी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर’ असा उल्लेख झाला. ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांचं कार्य आपल्या सर्वांना माहित आहे. माझ्याकडून बोलण्याच्या ओघात झालेल्या चुकीच्या उल्लेखाबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो,” अशा शब्दांत अजित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….