शिवसेना-वंचितचं ठरलं ; प्रकाश आंबेडकरांनी दिली महत्त्वाची माहिती…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ठाकरे गटाची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असं चित्र मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये एकत्र येण्यासंदर्भात बोलणी झालेली आहे.
मात्र महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा वंचितला सोबत घेण्यासाठी विरोध असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे पुढे आघाडीची चर्चा होत नसल्याची माहिती आहे.
परंतु येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शिवसेनेसोबत झालेल्या चर्चेमध्ये महानगर पालिका निवडणुका एकत्र लढवायचं ठरलं असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
आंबेडकर पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत नेण्याबाबत शिवसेना प्रयत्न करीत आहे. मात्र राष्ट्रवादीला वंचितला सोबत घ्यायला विरोध असून काँग्रेसचाही छुपा विरोध असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
त्यांनी पुढे म्हणाले की, गरीब मराठा सत्तेत यावा असं राष्ट्रवादीला वाटत नसावं म्हणून त्यांचा विरोध दिसतोय.असं असलं तरी आमचा आणि शिवसेनेचा निर्णय झाला, तो फक्त आम्हाला जाहीर करायचा आहे, असं स्पष्टीकरण आंबेडकर यांनी दिली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..