सत्ताधाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचं काम ; शरद पवार यांचा सकाळी सकाळीच हल्लाबोल……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी सकाळीच मीडियाशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला.
राज्यात सत्तेचा गैरवापर सुरू आहे. लोकप्रतिनिधींना डाऊन करण्यासाठीच सरकार काम करत आहे, अशी टीका करतानाच कोर्टाने अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना जामीन दिला आहे. आता त्यातून सत्ताधाऱ्यांनी काही तरी शिकलं पाहिजे, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. पवार यांच्या या टीकेवर सत्ताधारी काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सत्तेचा गैरवापर होत आहे. संजय राऊत आणि अनिल देशमुखांबाबत कोर्टाने निर्णय घेतला. काही सदस्य आतमध्ये आहे. त्यांनाही न्याय मिळेल. जामीन हा हक्क आहे. ज्या कारणाने या लोकांना आत टाकलं त्यात फारसं काही दिसत नाही, हा निष्कर्ष न्याय देवतेने काढला आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचं काम करण्यात आल्याचं स्पष्ट दिसतं, असं शरद पवार म्हणाले.
कोर्टाच्या निर्णयांवरून सरकारचा दृष्टीकोण चुकीचं आहे, हे दिसून आलंय. त्यातून सत्ताधाऱ्यांनी काही तरी शिकलं पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला.
1 फेब्रुवारीला केंद्राचं बजेट सादर होणार आहे. ते महत्त्वाचं आहे. त्यातून सरकारची नीती काय? हे दिसून येईल. या महत्त्वाच्या कालावधीत देशाचा विचार करून संसदेची गरीमा लक्षात ठेवून सरकारनं पावलं टाकली पाहिजे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचं कालच सूप वाजलं. गेल्या आठ दिवसात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तर सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना जशास तसे उत्तर देत कामकाज पुढे नेले.
या अधिवेशन कालावधीत दिशा सालियन प्रकरणी एसआयटीची चौकशीची घोषणा करण्यात आली. तसेच एकनाथ खडसे यांच्या पत्नीने केलेल्या भूखंड घोटाळ्याचीही एसआयटीकडून चौकशी करण्याचे जाहीर करण्यात आले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…