नॉट रिचेबल असलेल्या सत्तारांचा आला मेसेज ; जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- वाशिम येथील कथीत जमीन घोटाळाप्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला होता. या आरोपांवर आता सत्तारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्यावर सभागृहात आरोप झालेत तर याला मी सभागृहातच उत्तर देईन असं त्यांनी म्हटलं आहे.
अब्दुल सत्तार यांच्यावर सकाळी विधानसभा, विधानपरिषदेत जोरदार आरोप झाले यानंतर ते नॉट रिचेबल असल्याचं सांगतलं जात आहे. सकाळपासूनच अब्दुल सत्तार कुठे आहेत? अशा प्रकारची चर्चा सुरु होती. पण नागपूरमधील कृषी विभागाच्या संशोधन कार्यालयात ते पोहोचले आहेत. याठिकाणी त्यांनी स्वतः मीडियाशी न बोलता कृषी अधिकाऱ्यांच्यामार्फत मीडियापर्यंत मेसेज पोहोचवला. या मेसेजमध्ये “आपल्यावर सभागृहात आरोप झालेत तर त्याला उत्तरही आपण सभागृहातच देऊ” असं त्यांनी म्हटलं आहे.
सत्तार यांनी म्हटलं की, “सध्या या संपूर्ण विषयाची माहिती आपण घेत आहोत. तसेच या ठिकाणाहून आपण बाहेर पडणार नाही पण उद्या सभागृहातच त्यावर उत्तर देणार आहे.
सत्तारांवर विरोधकांनी काय केलेत आरोप?
सत्तारांवर विरोधकांनी जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ३७ एकर गायरान जमीन ज्याची किंमत १५० कोटी रुपये आहे. ही जमिनीच्या व्यवहारात सत्तारांनी हस्तक्षेप करत ती मोकळी करुन दिली, असा आरोप विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सभागृहात केली होती. सत्तारांकडून पदाचा दुरुपयोग झाला त्यामुळं त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अजित पवारांनी विधानसभेत केली. राजीनाम्याच्या मागणीनंतर आता अब्दुल सत्तार यांचा फोन बंद असल्याचं समोर आलं आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…