“मी तुम्हाला एक पेन ड्राईव्ह देणार आहे, कारण.”, उद्धव ठाकरे अधिवेशनात आक्रमक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- नागपूरमध्ये महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन सुरू आहे.
त्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सीमावादावर आक्रमक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी “मी तुम्हाला एक पेन ड्राईव्ह देणार आहे, कारण विरोधी पक्षात आल्यावर पेन ड्राईव्ह यायला लागतात,” असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. एवढाच काळ किंवा यापेक्षा जास्त काळ सीमाभागातील माणसं मराठीत बोलत आहेत. त्यांनी आंदोलनासह विविध मार्गांनी आम्हाला महाराष्ट्रात जायचं आहे असं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत. त्यावर ठरावही मान्य झाला आहे.”
“मी तुम्हाला एक पेन ड्राईव्ह देणार आहे. कारण विरोधी पक्षात आलं की पेन ड्राईव्ह यायला लागतात, अशी एक पद्धत झाली आहे. या पेन ड्राईव्हमध्ये महाराष्ट्र सरकारने केलेली ‘केस फॉर जस्टीस’ ही फिल्म आहे. ती फिल्म मी मुद्दामहून आणली आहे,” असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.