मादक पदार्थांच्या तस्करीने वाढविली चिंता ; महाराष्ट्र-मध्य प्रदेश राज्यपालांची संयुक्त बैठक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- देशांतर्गत होणाऱ्या मादक पदार्थांच्या तस्करीने सर्वच राज्यांची चिंता वाढविली असून त्यादृष्टीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांची बैठक शनिवारी येथे पार पडली.
अवैध गोवंश वाहतूक, अवैध मानवी वाहतूक, बेकायदेशीर खनिज उत्खनन, अवैध शस्त्रे, गुटखा, दारुविक्री, मादक पदार्थांची तस्करी दोन्ही राज्यांसाठी अतिशय चिंतेचा विषय असून, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्ह्यांच्या सीमेवरील चेकपोस्ट व सुरक्षा यंत्रणेला पुरेसे मनुष्यबळ पुरविणे आवश्यक आहे. तेथे सीसीटीव्ही यंत्रणा बसवून चोख निगराणी ठेवावी, तसेच नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी दोन्ही राज्यांच्या पोलिस खात्याने संयुक्त अभियान राबवावे, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, की पूरस्थिती व सिंचन प्रकल्पासंबंधीचे प्रश्न स्थानिक स्तरावर समन्वयाने सोडवावेत. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या नोंदी विशेष ॲप तयार करून नियमित घ्याव्यात, जेणेकरून त्यांची माहिती दोन्ही राज्यांतील प्रशासनाला मिळून त्यांना विविध योजनांचा लाभ देता येणे शक्य होईल. सीमावर्ती जिल्ह्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीचा दोन्ही राज्यांना फायदा होईल, असा विश्वास मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांनी व्यक्त केला.
ठाकरे गट शिवसैनिकांचे आंदोलन
महापुरुषांचा अपमान आणि वादग्रस्त व्यक्तव्य केल्याच्या निषेधार्थ बैठकीसाठी आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वाहनांच्या ताफ्याला ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी चपला दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी वाहनांच्या ताफ्यामध्ये चपला घेऊन शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

रंगराव काळे यांना विदर्भभूषण पुरस्काराने सन्मानित ; शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल….
Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती
विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”