बोम्मईंनी पुन्हा डिवचलं…! एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, कर्नाटक विधानसभेत ठराव मंजूर…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बेळगाव :- महाराष्ट्र-सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही कर्नाटकने पुन्हा महाराष्ट्राला डिवचले आहे. सीमा भागातील एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, असा ठरावच कानडी सरकारने दोन्ही सभागृहात काल मंजूर केला.
कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी म्हणूनच केंद्रीय गृहमंत्र्यांनी मध्यस्ती केल्याचाही उच्चार कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात आता महाराष्ट्र काय भूमिका घेतं णं महत्त्वाचं ठरणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांना कर्नाटकात सामील होण्याची इच्छा आहे, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता. तेव्हापासून या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले. गेल्या ६० वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद शमलेला नाही. त्यातच, महाराष्ट्रातील गावावर कर्नाटकने दावा केल्याने या वादात ठिणगी पडली. दरम्यान, महाराष्ट्राचे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना तिथे सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील नेत्यांना अडवण्यात आले. त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. कर्नाटक सरकारी ही मुजोरी एवढ्यावरच थांबली नाही. सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना त्यांनी त्यांच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव मंजूर करून घेतला. एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, असा ठराव समंत करून महाराष्ट्राला पुन्हा एकदा डिवचण्याचं काम कर्नाटक सरकारने केला आहे.
या ठरावाला कानडी सरकारमधील विरोधी पक्षानेही या ठरावाला पाठिंबा दिला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रादरम्यान असलेला सीमाप्रश्न महाजन आयोगानेच्या अहवालाने सुटला आहे. त्यामुळे संपलेल्या प्रश्नावरून शेजारील राज्यांनी उगाच वाद उगारून काढू नये, असं कर्नाटक विधिमंडळातील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी म्हटलंय.
सीमा भाग हा कर्नाटकचाच भाग आहे. याबाबत मी गंभीर असून केंद्रीय गृहमंत्रीच काय, पण पंतप्रधानांपुढे किंवा सर्वोच्च न्यायालयापुढे गेलो तरी आमच्या भूमिकेत कोणताच फरक पडणार नाही, अशी भूमिका कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केली.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केला विशेष कार्यक्रम
महाराष्ट्र एकीकरण समितीकडून सोमवारी बेळगावात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या मेळाव्याला महाराष्ट्राच्या नेत्यांना कर्नाटक सीमेवर अडवण्यात आलं. याचे पडसाद विधानसभा आणि विधान परिषेदत उमटले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सीमावर्ती भागातील मराठी बांधवांना आश्वस्त केले आहे. सीमा भागातील लोकांच्या सरकार पाठिशी आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच, सीमाभागातील प्रश्न सोडवण्याकरता विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..