उद्धव ठाकरे सभागृहात जात असताना समोर आले शिंदे गटाचे आमदार, आणि……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केलं. आज पहिल्यांदाच सहा महिन्याच्या या राजकीय राड्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आमनेसामने येणार आहे.
पण, त्याआधी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बंडखोरी करणारे आमदार हे उद्धव ठाकरेंच्या समोर आले होते. हिवाळी अधिवेशनामध्ये पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी पुन्हा एकदा 100 खोक्के एकदम ओक्केचे बॅनर घेऊन घोषणाबाजी केली. पण, दुसरीकडे विरोधकांना उत्तर देण्यासाठी शिंदे गटाचे आमदार सुद्धा फलक घेऊन अधिवेशनात उतरले. याच वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सभागृहात जात होते.
त्यावेळी शिंदे गटाचे आमदार बॅनर घेऊन घोषणाबाजीची तयारीत होते. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदाराकडे न पाहता सभागृहात जाण्यास निघाले. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे होते. उद्धव ठाकरे यांनी सभागृहात सोडून आल्यानंतर आदित्य ठाकरे पुन्हा आमदारांसोबत विधानभवनांच्या पायऱ्यावर उभे राहिले.
यावेळी, 50 खोके एकदम ओके असे बॅनर घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी असे बॅनरही घेऊन घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, प्रताप सरनाईक आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर घोषणाबाजी करण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहिले. यावेळी 50 आमदार एकदम ओके, घरी बसले बोके, असे बॅनर घेऊन घोषणाबाजी केली.
त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होताा. याच दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा तिथून सभागृहात गेले होते. त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी आपली घोषणाबाजी सुरूच ठेवली.
दरम्यान, आज सीमा वादाचा प्रश्न ,शेतकऱ्यांना न मिळालेली मदत या सर्व मुद्द्यांवरती विधानभवनाच्या पायऱ्यावरती विरोधक आंदोलन करतील आणि सभागृहातही आक्रमक राहणार आहेत. सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर तीनही पक्षांची भूमिका कशी असावी या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक झाली. श्रद्धा वालकर प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी लावण्यात आलेली आहे. त्यामुळे श्रद्धा वालकर या विषयासह आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली समिती यावरती विरोधक आक्रमक होणार आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..