शिंदे गटाचे 3 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, हिवाळी अधिनेशनानंतर शिंदे-भाजप सरकार… अमोल मिटकरींचा मोठा दावा काय…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जळगाव :- एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केलाय.
हिवाळी अधिवेशनानंतर शिंदे-भाजप सरकार कोसळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना हे पुरते माहिती आहे.. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की सरकार कोसळणार, असं वक्तव्य मिटकरी यांनी केलंय. जळगाव मुक्ताईनगर येथील ग्रामपंचायतींच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. एवढच नाही तर शिंदे गटाचे 3 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. एकनाथ खडसे स्टेजवर बसलेले असताना मी हे वक्तव्य करतोय, हे सरकार लवकरच पडणार आहे, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला.
सोमवारपासून म्हणजे 19 डिसेंबरपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. खरं तर अधिवेशनापूर्वीच शिंदे-भाजप सरकारमधील दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित होता. अनेक आमदार प्रतीक्षेत होते. मात्र मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतर होईल, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे इच्छुकांच्या वाट्याला पुन्हा प्रतीक्षाच आली.
दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक नाराज आमदार बंड करतील, शिंदे-भाजप सरकार कोसळेल, अशी शक्यता महाविकास आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केली होती. अमोल मिटकरी यांनीही हाच धागा पकडत शिंदे सरकार कोसळण्याचं भाकित केलंय. अधिवेशनापूर्वीच काही आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा आहे, असं मिटकरी म्हणाले.
जळगावातील मुक्ताईनगर येथे बोलताना अमोल मिटकरी यांनी गिरीश महाजनांवर आरोप केले. ग्रामविकास मंत्री असल्याने ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायती आहेत, तिथे तिथे तक्रारी करा. मी ग्रामपंचायत रद्द करतो, असे थेट आदेशच महाजनांनी दिले आहेत. त्यामुळे माझे 13 सदस्य अपात्र ठरल्याचा आरोप मिटकरी यांनी केलाय.
सभेत बोलताना मिटकरी यांनी महाराष्ट्र सरकारच्या लव्ह जिहादविरोधी धोरणांवर टीका केली. सरकारने आंतरधर्मिय विवाहांची नोंद घेण्याचे ठरवले आहे. मात्र गल्लीतले लग्न मोजताय, मग दिल्लीतल्या लग्नांचं काय असा सवाल मिटकरी यांनी केला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते मुख्तार अब्बास नकवी यांच्या पत्नीचे नाव रेणू शर्मा कसे? गौरी खान आमिर खान यांचाही लव्ह जिहादच म्हणायचा का? सैफ अली खान करीना कपूर यांचाही लव्ह जिहाद आहे का, असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….