त्यांच्या पक्षाच्या नावातच ‘महाराष्ट्र’ ; संजय राऊतांच्या आवाहनानंतर राज ठाकरे “मविआ” च्या महामोर्चात सहभागी होणार….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून महाविकास आघाडीकडून मुंबईत शनिवारी 17 डिसेंबरला महामोर्चा काढण्यात येणार आहे.
सर्व महाराष्ट्र प्रेमींना या मोर्चाला पाठिंबा देण्याचं आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील सर्वांना मतभेद झुगारुन मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन राज ठाकरेंसह सर्वांना केलं आहे.
राज ठाकरे देखील विरोधातच आहेत. ते सरकारमध्ये नाही. आम्ही सगळे महाराष्ट्रप्रेमी म्हणून मोर्चात उतरलो आहोत. त्यांच्या तर पक्षाच्या नावात महाराष्ट्र आहे. त्यांनी देखील महाराष्ट्राचा अपमान होत असताना बाहेर यावं. सगळे मतभेद विसरुन, महाराष्ट्रद्रोही सरकार, बेकायदेशीर सरकार, बेमान सरकार, घटनाबाह्य सरकारच्या विरोधात उभं राहणं गरजेचं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पोलिसांकडून चोख व्यवस्था
महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. भाजपही मविआच्या मोर्चाविरोधात प्रतिमोर्चा काढणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलिस बंदोबस्तात हा मोर्चा पार पडणार आहे.
महाविकास आघाडीच्या मोर्चाला दोन ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यात दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त, 4 ते 5 पोलिस उपायुक्त यांच्याद्वारे हा बंदोबस्त हाताळण्यात येणार आहे.
या मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आणि कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही या अनुशंगाने स्थानिक परिसरात पोलिस आवाहन करणार आहेत. सोबतच या मोर्चात SRPFच्या वाढीव तुकड्यांचाही बंदोबस्त लावण्यात येणार. तसेच ड्रोनच्या माध्यमातून पोलिस मोर्चावर लक्ष ठेवणार आहेत.

रंगराव काळे यांना विदर्भभूषण पुरस्काराने सन्मानित ; शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल….
Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती
विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”