अखेर दिल्लीत ठरला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त, ‘या’ दिवशी होणार शपथविधी….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असून, अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे.
हिवाळी अधिवेशनापूर्वीच शिंदे,फडणवीस सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची चर्चा होती. मात्र हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळचा विस्तार होण्याची शक्यता दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनासाठी आपल्याकडील अतिरिक्त खात्यांचा पदभार इतर मंत्र्यांकडे सोपवला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार हा अधिवेशनानंतरच होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
सूत्रांकडून देखील तशी माहिती समोर आली आहे.
अमित शाह यांच्यासोबत बैठक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असून, हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जात आहे.
विरोधकांची टीका गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे.
यावरून विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. शिंदे गटातील प्रत्येक आमदाराला मंत्रिपद हवं आहे. जर अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर हे आमदार फुटतील, या भीतीने मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. तर याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..