दिल्ली पुन्हा हादरली ; बारावीच्या विद्यार्थीनीवर अॅसिड हल्ला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- श्रद्धा वालकर हत्याकांडाचा तपास सुरू असतानाच पुन्हा एकदा दिल्लीतून हादरवणारी बातमी समोर आली आहे.
देशाच्या राजधानीत एका १२ वीत शिकणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे.
या घटनेत मुलीच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाल्याचे सांगितले जात असून, तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेवेळी पीडित मुलगी घटनेच्या वेळी तिच्या लहान बहिणीसोबत होती. त्यावेळी या मुलीच्या चेहऱ्यावर अचानक अॅसिड हल्ला करण्यात आला. या प्रकरणी दोघांवर संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास दिल्लीतील द्वारका मोड भागात घडली आहे.
हल्लेखोर आणि पीडित मुलगी एकमेकांना ओळखत होते असे सांगितले जात असून, जखमी मुलीला सफदरजंग रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. पीडितेवर हा हल्ला नेमका का करण्यात आला याचे कारण अद्याप समजू शकलेले नसून, दिल्ली पोलीस तपास करत आहेत.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….