चंद्रकांत पाटलांच्या अंगावर शाई फेकणाऱ्याला 51 हजारांचे बक्षीस; प्रकरणाचं ‘बारामती कनेक्शन’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बारामती :- भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकेल त्याला 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करणारे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड आणि इतर चौदा जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचे बारामती कनेक्शन असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी भाजप तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी फिर्याद दिली आहे .त्यानुसार शनिवारी रात्री उशिरा तालुका पोलीस ठाण्यात ऋषी गायकवाड यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमेश्वर नगर परिसरात मोर्चाला संबोधित करत असताना गायकवाड यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर महाराष्ट्रात प्रथम जो शाई फेकेल, त्याला 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर पुणे येथे काळी शाई फेकली गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
शाई फेकणारा चा बारामतीत सत्कार करून त्याला 51 हजार रुपये बक्षीस देणार असेही गायकवाड यांनी जाहीर केले,असे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी भाजप कार्यकर्तेअविनाश मोटे, पांडुरंग कचरे,ज्ञानेश्वर माने, सुधाकर पांढरे, जगदीश कोळेकर, चंद्रकांत केंगार आधी कार्यकर्त्यांनी यावेळी पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….