चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बॅनरबाजी.. महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून काँग्रेसने व्यक्त केला निषेध…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेबांनी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होत. त्यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाले आहे.
काँग्रेसने चंद्रकांत पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ पुण्यात जोरदार बॅनरबाजी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या अनेक नेत्यांकडून आक्षेपार्ह विधानाचा मालिका सुरु होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यानंतर प्रसाद लाड यांनी देखील केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील पैठणमध्ये केलेल्या विधानामुळे पुण्यात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील यांचा एडिट केलेला फोटो बॅनरवर वापरून ‘भिकेमध्ये मिळालेला कोथरूड मतदारसंघ’ असा मजकूर लिहून हे बॅनर लावण्यात आले आहेत. पुणे शहर युवक काँग्रेसच्यावतीने पालकमंत्री कार्यालयासमोर हे बॅनर लावून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील नेमकं
चंद्रकांत पाटील म्हणाले, देशात शाळा कोणी सुरू केल्या, कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या. महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्या शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान नाही दिले. त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरू करायची आहे, मला पैसे द्या. त्या काळात 10 रुपये देणारे होते. आता 10-10 कोटी रुपये देणारी लोक आहेत, असे विधान पाटील यांनी पैठणमधील एका कार्यक्रमात केले होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….