आता बच्चू कडूं यांचा कडून घराणेशाही ; बंधू भैय्या कडू निवडणुकीच्या रिंगणात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि आमदार असलेले बच्चू कडू मागील काही दिवसांपासून नाराजीमुळे चर्चेत आहेत. कडू यांनी मंत्रीपद न मिळाल्याने नाराजीही व्यक्त केली होती. त्यातच आता बच्चू कडू यांच्यासंदर्भात एक बातमी समोर आली असून बच्चू कडू यांच्या घरातूनही आता घराणेशाही सुरू होणार असं चित्र आहे.
वास्तविक बच्चू कडू संघर्ष करून राजकारणात आलेले आहेत.
बच्चू कडू यांचे बंधू भैय्या कडू सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. चांदूर बाजारमधील बेलोरा ग्रामपंचायत निवडणूक भैय्या कडू लढवणार आहे. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरणार हे स्पष्ट आहे.
यावेळी भैय्या कडू कडू म्हणाले की, ही निवडणूक गावाच्या विकासासाठी आणि बच्चू कडू यांच्यासाठी महत्त्वाची आहे. गावाच्या विकासासाठी आम्ही सतत तत्पर आहोत. या बळावरच आम्ही निवडणूक जिंकू, असा विश्वासही भैय्या कडू यांनी व्यक्त केला आहे.
बच्चू कडू मागील अनेक वर्षांपासून अपंगांसाठी काम करतात. नव्या सरकारमध्ये बच्चू कडू यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळणार अशी चर्चा आहे. मात्र त्यांच्या बंधूंसाठी ग्रामपंचायत निवडणूक सोपी नसणार हे स्पष्ट आहे. कारण ग्रामपंचायत निवडणूक सर्व निवडणुकांपेक्षा अत्यंत खडतर निवडणूक मानली जाते.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….