प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयाआधीच वंचितचा ‘तो’ मोठा नेता ठाकरे गटात….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभेचा आज निकाल लागला असून भाजपने गुजरातमध्ये एतिहासिक विजय मिळवला आहे.
आता राज्यातील राजकीय (Maharashtra Politics) परिस्थिती पाहिली तर आगामी निवडणुकांसाठी आता सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामुळे राज्यात नवी राजकीय समीकरणं होण्याची शक्यता आहे. शिंदे गट बाहेर पडल्यानंतर आता ठाकरे गटाला एका साथीदाराची गरज आहे. वंचित बहुजन आघाडी आता महाविकास आघाडीमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते हाजी अस्लम सय्यद यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. एकीकडे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना सय्यद यांच्या ठाकरे गटातील पक्षप्रवेशाने प्रकाश आंबेडकरांना धक्का मानला जात आहे.
ठाकरे गटाने वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले असले तरी ते प्रत्यक्षात सुद्धा महाविकास आघाडीत सहभागी होणार याबाबत संभ्रम आहे. प्रकाश आंबेडकर यांना सहभागी करून घेण्याबाबत यावर कोणत्याही नेत्याने यावर अधिकृत भूमिका स्पष्ट केली नाही.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..