शिंदे गटात गेल्यानंतर आरोपी आमदार-खासदारांवर ईडीने काय कारवाई केली….? मुंबई हायकोर्टात याचिका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याच्या राजकारणातील आताची एक महत्त्वाची बातमी. शिंदे गटात गेल्यानंतर आरोप असलेल्या आमदार आणि खासदारांवर ईडीने काय कारवाई केली, असा सवाल उपस्थित करत ईडिविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील नितीन सातपुते यांनी ही जनहित याचिका (Petition) दाखल केली आहे. ईडीच्या रडारवर असलेल्या शिंदे गटात गेलेल्या खासदार आमदारांवर काय कारवाई केली यासंदर्भातील माहिती देण्यात यावी असं या याचिकेत सांगण्यात आलेलं आहे.
शिंदे गटात गेलेले आनंदराव अडसूळ, अर्जुन खोतकर, यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव, भावना गवळी, प्रताप सरनाईक यांना समन्स देण्यात आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर ईडीने समन्स जारी करण्याची कोणतीही कारवाई केलेली नाही असा याचिकेत दावा करण्यात आला आहे. ईडीकडून कारवाईचा अहवाल घ्या आणि तो 7 दिवसांत सादर करा अशी मागणी याचिकेतून न्यायालयाकडे करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 15 डिसेंबर रोजी होणार आहे
हे नेते होते ईडीच्या रडारवर
शिवसेनेतून बंड करुन एकनाथ शिंदे यांच्याकह चाळीस आमदार यांनी शिंदे गट स्थापन केला. त्यानंतर भाजपशी हातमिळवणी करुन राज्यातही सत्ताही स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात ईडीच्या रडारवर असलेले काही नेतेदेखील आहेत. यापैकी प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे यांचे कट्टा विरोधक मानले जायचे, एनएससीएल घोटाळ्याप्रकरणी प्रताप सरनाईक ईडीच्या रडारवर होते. प्रताप सरनाईक यांची मालमत्ताही जप्त करण्यात आली होती. पण आता शिंदे गटात सामिल झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी शिवसेना आमदार यामिनी जाधव यांच्यावर शिवसेनेत असताना ईडीने आर्थिक घोटाळ्याचा आरोप केला होता. काही महिन्यांपूर्वी इन्कम टॅक्स विभागानेही जाधव यांच्या घरी आणि कार्यालयावर छापेमारी केली होती, यात 40 प्रॉपर्टी जप्त करण्यात आल्या, त्यानंतर ईडीने मनी लॉण्ड्रींग प्रकरणी जाधव यांना चौकशीसीठी नोटीस बजावली. यशवंत जाधव यांची संपत्ती 138 कोटी इतकी होती, ती 300 कोटींच्या घरात पोहोचली, 24 महिन्या त्यांनी 38 संपत्ती खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
शिवसेना खासदार भावना गवळही ईडीच्या रडार वहोत्य. भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमधील गैरव्यवहार प्रकरणी ईडीने नोव्हेंबर महिन्यात आरोपपत्र दाखल केलं होतं. याप्रकरणई भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान ईडीच्या अटकेत आहेत. त्यांची साडेतीन कोटी रूपयांची मालमत्ता ईडीने तात्पुरती जप्त केली होती.
शिवसेना नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी ईडीकडे अडसुळांविरोधात तक्रार केली होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..