शिंदे गटातील काही खासदार भाजपच्या तिकिटावर लढणार…? ; ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पुढील लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच अवकाश आहे, मात्र सत्ताधारी भाजपने अनेक लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. यात पालघर मतदारसंघाचाही समावेश आहे. पालघरचे खासदार राजेंद्र गावित हे सध्या शिवसेनेचे खासदार असून, ते शिंदे गटात गेलेले आहेत.
गावित यांनी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि आता शिंदे गट असा प्रवास केलेला आहे. जिकडे सत्ता तिकडे राजेंद्र गावित असेच जणू समीकरण झालेले आहे. हे पाहता खासदार गावित हे शिंदे गटातून लोकसभेची निवडणूक लढतील की भाजपमधून? याविषयीची सध्या पालघरमध्ये चर्चा रंगताना दिसत आहे. शिंदे गटातील काही खासदार भाजपच्या तिकिटावर लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात गावितही असू शकतात, अशीच चर्चा होत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..