भारताला मोठा धक्का…! हिटमॅन रोहित मैदानातून थेट रुग्णालयात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- भारत-बांगलादेश वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान भारताला मोठा धक्का बसला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माला गंभीर दुखापत झाली आहे. क्षेत्ररक्षणादरम्यान, हिटमॅन स्लिपवर उभा होता, तेव्हा एक चेंडू त्याच्या डाव्या हाताला जोरात लागला.
या घटनेनंतर रोहित वेदनेने रडताना कॅमेऱ्यात कैद झाला. रोहितच्या हातातूनही रक्त येत होते त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. रोहितला एक्स-रेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
बीसीसीआयने ट्विटरवर लिहिले की, ‘टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अंगठ्याला दुखापत झाली आहे, बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याची तपासणी करत आहे आणि सध्या त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले आहे.’ रोहितच्या जागी उपकर्णधार केएल राहुल सध्या मैदानावर संघाचे नेतृत्व करत आहे.

या घटनेत एकीकडे रोहित शर्मा जखमी झाला, तर दुसरीकडे ब्लू आर्मीला एक विकेट मिळू शकली असती जी मिळाली नाही. सिराजच्या दुसऱ्या षटकात ही घटना घडली. रोहितने हा झेल नीट घेतला असता तर भारताचे दुहेरी नुकसान टाळता आले असते. मात्र, या घटनेनंतर लगेचच सिराजने अनामूलला एलबीडब्ल्यू करून पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..