शिवसैनिकांचा दणका, कर्नाटकच्या बसेसना काळे फासले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- पुण्यात संतप्त शिवसैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा जोरदार घोषणा देत कर्नाटकातील खासगी बसेसना काळे फासले. या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ घोषणा लिहून कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
स्वारगेटमधील लक्ष्मीनारायण चौक भागात असलेल्या सना ट्रव्हल्सच्या परिसरात कर्नाटकातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडय़ा पार्क केल्या जातात. शिवसैनिकांनी या गाडय़ांना काळे फासून ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणा बसेसच्या काचांवर लिहिल्या.
शंभुराज आणि चंद्रकांत पाटलांना बांगडय़ांचा आहेर
कोल्हापुरातील शिवसैनिकांनी थेट बेळगावच्या सीमेवर धडक दिली. बेळगावात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह शिवसैनिकांना ताब्यात घेतले. बेळगावचा दौरा रद्द करणारे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांना प्रतीकात्मक बांगडय़ांचा आहेरही शिवसैनिकांनी दिला.
कशासाठी?निवडणुकीसाठी…
कर्नाटकातील भाजपचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी जतमधील 42 गावांवर दावा सांगितला, त्यानंतर अक्कलकोटमधील गावांवर हक्क, सोलापूर, कोल्हापुरात कर्नाटक भवन उभारू, अशी वक्तव्ये केली.
मुख्यमंत्री बोम्मई आत्ताच ही बडबड का करू लागले? अर्थात यामागे आगामी कर्नाटक विधानसभा निवडणूक हे कारण असल्याचे सांगितले जाते.
येत्या सहा महिन्यांत म्हणजेच मे 2023 मध्ये कर्नाटकात विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळेच भाजपने सीमा प्रश्नांचा वाद वाढविला आहे, अशी चर्चा आहे.
सौदत्ती यात्रेला गेलेले कोल्हापुरातील लाखो भाविक कर्नाटकात अडकले.
संताप… संताप..
बोम्मई यांच्या दमदाटीला घाबरून महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारचे मंत्री तंतरले आणि दौरा स्थगीत करून बसले. स्वतŠसाठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत?
आदित्य ठाकरे
हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरचा हल्ला असून त्याचा केवळ निषेध करून चालणार नाही तर ‘अरे’ला ‘कारे’ करण्याची हिंमत आता महाराष्ट्र सरकारने दाखवावी. महाराष्ट्राची एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे.
अजित पवार
छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडिगांनी केलेली तोडपह्ड निषेधार्ह आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..