महिलांसाठी लष्करी पोलिस भरती सोमवारपासून सुरू…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- भारतीय सैन्यदलाच्या येथील दक्षिण मुख्यालयाच्या वतीने महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया अग्निवीर भरती प्रक्रियेअंतर्गत सोमवार (ता.६) ते रविवार (ता. ११) या कालावधीत खडकी येथील बीईजी अँड सेंटर येथे पार पडणार आहे. यात महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि दमणमधील तरुणींना सहभागी होता येणार आहे. देशसेवेसाठी लष्करात महिलांना संधी मिळावी तसेच त्यांना देशसेवेची जबाबदारी पार पाडता यावी, याअनुषंगाने हा मेळावा होत आहे.
ही प्रक्रिया शारीरिक, वैद्यकीय व लेखी परीक्षा अशा तीन टप्प्यांत पूर्ण होणार आहे. दरम्यान, शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षा देता येणार आहे. तसेच गुणवत्तेवर आधारित अंतिम उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना भारतीय सैन्य दलात लष्करी पोलिस विभागात अग्निवीर म्हणून दाखल केले जाणार आहे. या भरती मेळाव्यासाठी राज्य आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..