नागपूरमधील संघाच मुख्य कार्यालय उडवून देणार….? धमकी देणारा व्यक्ती ताब्यात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपुर :- नागपूरमधील संघाच रेशीमबाग मुख्य कार्यालय, रेशीमबाग मैदान आणि भट सभागृह स्फोटाने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे अशा आशयाच पत्र लिहून खळबळ उडवून देणारा आरोपी हा महापरिषणचा अभियंता असल्याची माहिती समोर आली आहे.
या महापरिषणच्या अभियंत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 25 नोव्हेंबरला नागपूरच्या सक्करदरा पोलिस स्टेशनमध्ये पत्र आलं होतं. या पत्रामद्धे संघाचं रेशीमबाग कार्यालय, रेशीमबाग मैदान परिसर आणि मैदानाजवळील भट सभागृह उडवून देऊ, स्फोट करू अशा पद्धतीचा आशय लिहण्यात आला होता. त्यावर बॉम्बच चित्रही काढण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या पत्राचा गांभीर्याने तपास केला.
दरम्यान ज्या पोस्ट ऑफिसमधून हे पत्र आलं होतं. त्या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले. सीसीटीव्ही एक व्यक्ती हे पत्र टाकताना दिसला त्यानंतर त्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. तेव्हा तो महापारेषणचा अभियंता असल्याची माहिती समोर आली आहे. इतका शिक्षित व्यक्ति अशा स्वरूपाची धमकी का देत आहे. याचा पोलिसांनी शोध घेतला तेव्हा माझी मानसिक स्थिति ठीक नाही असा बचावात्मक पवित्रा या व्यक्तीने घेतला आहे.

हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!