जयंत पाटील यांचा मुलगा प्रतिक पाटीलच्या शाही विवाह सोहळ्यात या विरोधी पक्षनेत्यांची हजेरी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
इस्लामपूर :- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतिक पाटील यांचा विवाह सोहळा काल रात्री थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याची भरपूर चर्चा झाली.या शाही विवाह सोहळ्याला सर्व पक्षीय राजकीय मंडळींनी हजेरी लावली होती.
पाटील यांच्या विवाह सोहळ्यात वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, श्रीमंत शाहु महाराज, खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते.
तर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, विधानसभआ अध्यक्ष राहुल नार्वेकर, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील मंत्री, आमदार आणि खासदारांसह अनेक बडे नेते उपस्थित राहिले.या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकत्र आले होते. इस्लामपूर-बहे राजेबागेश्वरच्या पूर्वेस शाही लग्नसोहळा पार पडला.
शिंदे गटातील नेते आणि उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांची या विवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शंभुराज देसाई एकमेकांशी गप्पा मारताना दिसून आले. सुप्रिया सुळे यांनी देसाईंच्या कानात काहीतरी सांगितलं. त्यानंतर शंभुराज देसाई खो-खो हसले. इतक्यात शेजारीच उभे असलेले राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडेही जवळ आले. सुप्रिया सुळे त्यांच्याही कानात काहीतरी कुजबुजल्या. त्यानंतर तिघेही एकत्रित हसताना दिसले.

Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती
विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’