पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक ; रात्री उशिरा ATS नं घेतलं ताब्यात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर पथकानं अमनला ताब्यात घेतलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकावल्याच्या आरोपाखाली अमन सक्सेना या तरुणाला शनिवारी रात्री अटक करण्यात आली.
या प्रकरणात एक तरुणी आणि गुजरातमधील एका तरुणाचं नाव समोर आलं होतं. गुजरात एटीएस या सर्वांचा शोध घेत होती.
रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर पथकानं अमनला ताब्यात घेतलं. गुजरात एटीएसचे निरीक्षक व्हीएन बघेला हे पथकासह रात्री दहाच्या सुमारास सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात पोहोचले. यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीनं अमन सक्सेनाला आदर्शनगरमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालयाच्या आयडीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात गुजरातमधील एक तरुण आणि तरुणीचं नाव पुढं आलं. त्यानंतर एटीएस सक्रिय झाली. संयुक्त पथक तिन्ही आरोपींचा शोध घेत होतं.
दरम्यान, अमनचं लोकेशन ट्रेस होताच हे पथक रात्री शहरात पोहोचलं. आरोपी अमन सक्सेना हा काही काळापूर्वी राजर्षी कॉलेज, बरेली इथं अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होता. परंतु, त्यानं ते शिक्षण अपूर्ण सोडलं. आरोपींनी कोणत्या उद्देशानं धमकी दिली, याचा तपास सुरू आहे. गुजरात एटीएसचे निरीक्षक बघेला यांनी इतर दोन आरोपींबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..