’24 तासात माफी मागा नाहीतर दिसेल तिथे झोडपून काढू’; अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादीचं अल्टिमेटम, राजीनामा देण्याचीही मागणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
अब्दुल सत्तार यांनी 24 तासाच्या आत माफी नाही मागितली तर दिसेल तिथे झोडपून काढू, असा इशारा राष्ट्रवादीनं दिला आहे. यांना 50 खोक्यांची मस्ती आली आहे, यांची मस्ती उतरवली जाईल, असं देखील राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्यभर सत्तारांच्या पुतळ्यांना जोडे मारणार
सत्तारांनी सुप्रिया सुळेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. दहा पक्ष बदलणारे सत्तार हे सत्तार आहेत की सुतार आहेत. अब्दुल सत्तारांना सत्तेची मस्ती आलीय, ही मस्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिरवेल. राज्यभर सत्तारांच्या पुतळ्यांना जोडे मारुन त्यांच्या पुतळ्याचं दहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस करणार आहे. सत्तारांना धडा शिकवल्याशिवाय रायुकाँ स्वस्थ बसणार नाही, असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे.


एकनाथ शिंदे यांनी तात्काळ अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे विभागाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा अब्दुल सत्तार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा वैशाली नागवडे यांनी दिला आहे.
काय म्हणाले सत्तार
सत्तार म्हणाले की, आमच्यावर खोके म्हणणाऱ्या लोकं भिकार** असल्याचं सत्तार म्हणाले. तर सुप्रिया सुळे यांचा देखील सत्तार यांनी असाच उल्लेख केला. विशेष म्हणजे एकदा नाही तर दोनवेळा सत्तार यांनी आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे आता राज्यभरातून त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे.
स्त्रियांबद्दल अपशब्द वापरणे हेच शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांचं हिंदुत्व आहे का?सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्तारांचा जाहीर निषेध, असं काँग्रेस मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटलं आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….