अंधेरी जिंकल्यानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया, पतीच्या आठवणीने झाल्या भावुक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ‘हा विजय माझा नाही तर माझ्या पतीचा आहे. मतदारांनी माझ्या पतीने जे काम केले त्यालाच लोकांनी आज प्रतिसाद दिला. या विजयाचा मी जल्लोष करणार नाही, मला खंत आहे की, पतीच्या निधनानंतर निवडणूक लढवली’ असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी सर्वांचे आभार मानले.
राज्यात कधी नव्हे ते पहिल्यांदाच एखाद्या पोटनिवडणुकीत राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. त्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल जवळपास आता स्पष्ट झाला आहे. ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. या विजयानंतर लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला.
‘त्यांनी उमेदवारी जरी मागे घेतली तरीही त्यांनी नोटा साठी मतदान करण्यासाठी प्रचार केला होता. त्याचे व्हिडीओ सुद्धा समोर आले होते. पण मतदारांनी या सगळ्या गोष्टींना नाकारलं आणि शिवसेनेला मतदानं केलं. जे नोटाचे वोटिंग झाले आहे ते भाजपचेच आहेत.
त्यामुळे त्यांना तेवढीचं मत मिळतील असे वाटत होते म्हणून त्यांनी माघार घेतली. त्यांना सहानुभूती असती तर त्यांनी आधीच उमेदवार दिला नसता’ अशी टीका लटके यांनी केली. ‘रमेश लटके यांनी जी काही काम हाती घेतली होती, ती राहिली होती ती पूर्ण करणार आहे. अंधेरीचा विकास हेच माझं ध्येय आहे.
उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वाद आणि आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्या साथ दिल्यामुळे मी जिंकले आहे. आता मातोश्रीवर जाणार आहे’ असंही लटके म्हणाल्या.
‘आम्हीही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढलो.
मला उमेदवारी जेव्हा जाहीर झाली तेव्हापासून तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली आहे. हा विजय त्यांचा आहे, त्यांचे मी आभार मानते. हा जल्लोष मी साजरा करणार नाही. ही पोटनिवडणूक आहे.
माझ्या पतीचे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक झाली. मी माझ्या पतीच्या जागेवर ही निवडणूक लढवली आहे. माझ्या पतीचा हा विजय आहे. अंधेरीचा विकास व्हावा, हा त्यांचा विचार होता.
आम्हाला नवं पक्षचिन्ह मिळालं, त्या चिन्हाखाली हा विजय आहे. त्याचा जल्लोष होईल. पण मला एक खंत आहे. पतीच्या जागेवर निवडणूक लढवावी लागली’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल – अठरावी फेरी.
(18)ऋतुजा लटके – 62335बाळा नडार – 1485मनोज नाईक – 875मीना खेडेकर – 1489फरहान सय्यद – 1058मिलिंद कांबळे – 606राजेश त्रिपाठी – 1550नोटा – 12691एकूण – 85089

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….