बाराव्या हप्त्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत…? नाराज होऊ नका, आली मोठी अपडेट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत 12 वा हप्ता जारी केला आहे. त्यामुळे 12 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ लागले आहेत.
पीएम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे यावेळी सुमारे 2.62 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले नाहीत. मात्र, या शेतकऱ्यांनी निराश होण्याची गरज नाही. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 12वा हप्ता अद्याप मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात 30 नोव्हेंबरपर्यंत पैसे जमा केले जातील.
दरम्यान, केंद्र सरकारची (Central Government) सर्वात महत्वाकांक्षी योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2022 अंतर्गत पैसे मिळाले नाहीत, तर तुम्ही तात्काळ केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करु शकता. त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया…
तक्रार कुठे आणि कशी करायची?
जर तुमच्या खात्यात 2000 रुपये आले नसतील तर तुम्ही प्रथम तुमच्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
जर हे लोक तुमचे ऐकत नसतील किंवा त्यानंतरही खात्यात पैसे आले नाहीत तर तुम्ही संबंधित हेल्पलाइनवर कॉल करु शकता.
हा डेस्क (PM-KISAN Help Desk) सोमवार ते शुक्रवार चालू असतो.
याशिवाय pmkisan-ict@gov.in या ई-मेलवरही संपर्क साधू शकता.
तरीही काम करत नसल्यास 011-23381092 (डायरेक्ट हेल्पलाइन) या क्रमांकावर कॉल करा.
कृषी मंत्रालयाकडे तक्रार करा
कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे एखाद्या लाभार्थी शेतकऱ्याच्या (Farmers) बँक खात्यात पोहोचत नसतील, तर त्याचे त्वरित निराकरण केले जाईल. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचले नसतील किंवा काही तांत्रिक अडचण असेल तर ती कोणत्याही परिस्थितीत दुरुस्त केली जाईल.
तुम्ही संपर्क करु शकता
घरबसल्या तुम्ही या योजनेचे स्टेटस सहज तपासू शकता आणि अर्जही करु शकता. तुम्ही या योजनेच्या शेतकरी कल्याण विभागात संपर्क साधू शकता. त्याचा दिल्लीतील (Delhi) फोन नंबर 011-23382401 आहे, तर ई-मेल आयडी (pmkisan-hqrs@gov.in) आहे.
मंत्रालयाशी संपर्क साधण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे (कृषी मंत्रालय हेल्पलाइन क्रमांक)
पीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261
पीएम किसान लँडलाइन क्रमांक: 011-23381092, 23382401
पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: 011-24300606
पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….