आझम खान यांची आमदारकी रद्द ; द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात ठरले होते दोषी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना 2019 च्या द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. रामपूर न्यायालयाने गुरुवारी आझम खान यांना द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी 2000 रुपयांच्या दंडासह तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
खान यांना दोषी ठरवल्यानंतर, यूपी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाने शुक्रवारी जाहीर केले की सपा नेते आणि रामपूरचे आमदार आझम खान यांची आमदारकी रद्द करण्यात येत आहे.
रामपूर न्यायालयाने आझम खान यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात चिथावणीखोर टिप्पणी केल्याबद्दल दोषी ठरवले आहे.
आझम खान यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 153ए (दोन गटांमधील वैर वाढवणे), 505 (सार्वजनिक गैरव्यवहारास कारणीभूत असलेले विधान) आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 125 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….