मुख्यमंत्री महोदय, ‘आता दिवाळीचा फराळ पाठवा’ भंडाऱ्यात नागरिकांची थेट मागणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
भंडारा :- आता मुख्यमंत्री साहेब तुम्हीच आम्हाला दिवाळीचा फराळ पाठवा!! ही संतप्त भावना भंडारा जिल्ह्यातील राशन कार्ड धारकांची असून अद्याप ही आनंदाच्या शिधा उपलब्ध न झाल्याने आता फराळ कसा बनवावा असा प्रश्न रेशन कार्ड धारकांना पडला आहे.
त्यामुळे आनंदाच्या शिदा न मिळाल्याने संतप्त रेशन कार्ड धारकांनी आनंदाच्या शिधासाठी भंडाऱ्यात चक्क रेशन दुकानासमोर रास्ता रोको आंदोलन केल्याची घटना भंडारा शहरालगत पिपरी पुनवर्सन येथे घडली आहे. राज्य सरकारने शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा अर्थात चार साहित्याची कीट देण्याची घोषणा केली होती. मात्र दिवाळीच्या दिवस येऊनही भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात अद्यापही आनंदाची किट पोहोचली नाही. आज दिवाळीचा दिवस असल्याने भंडारा जिल्ह्यातील पिपरी पुनर्वसन येथील रेशन कार्डधारकांनी सकाळीच स्वस्त धान्य दुकान गाठले.
दुकानदाराला आनंदाचा शिधाची मागणी केली. मात्र शिधाच उपलब्ध न झाल्याने सरकारचा निषेध करत नागरिकांनी चक्क रास्त्या रोको आंदोलन केलं. जोपर्यंत रेशन कीट मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याच्या निर्धार कार्डधारकांनी आता केला आहे. तर दुसरीकडे कीट न आल्याने रेशन दुकानादाराने काय करावे असा बिकट प्रश्न रेशन दुकानदारासमोर उभा ठाकला आहे.
त्यामुळे आता दीपपूजनाला काही तास असल्याने या वेळेत फराळ तयार करणे शक्य नसल्याने संतप्त रेशन कार्ड धारकांनी थेट मुख्यमंत्र्यांनीच दिवाळीचा फराळ सर्व कार्ड धारकाच्या घरी पोहोचवावा अशी विनवणी केली आहे.
त्यामुळे वेळेत कीट द्यायची नव्हती तर जाहिरातबाजी करण्याची गरज क़ाय हाच प्रश्न आंदोलन रेशनकार्ड धारक करत आहे. रेशन दुकानदाराने संतप्त कार्डधारकांची समजूत काढल्यानंतर त्यांनी आंदोलन तूर्तास मागे घेतले आहे. पण अद्यापही रेशन न मिळाल्याचा संताप नागरिकांमध्ये बघायला मिळत आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….