बच्चू कडू यांना ५ हजाराचा दंड; काय आहे कारण….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना उस्मानाबाद न्यायालयाने 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बच्चू कडू यांच्यासह अन्य तीन आरोपींना देखील दंड ठोठावला आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेत आंदोलनादरम्यान वाद झाला होता. त्यानंतर कडू यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. 14 जानेवारी 2019 पासून प्रकरण प्रलंबित असल्याने उस्मानाबाद कोर्टाने बच्चू कडू यांना खडे बोल सुनावले आहेत. यापुढे सुनावणीला हजर न राहिल्यास जामीन रद्द करण्याची तंबी देखील जिल्हा न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी दिली आहे.
शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू कोर्टात हजर न झाल्याने उस्मानाबाद कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले होते.
याआधी म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी मंत्रालयातील कर्मचारी मारहाण प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना नियमित जामीन मंजूर केला होता. साल २०१८ मध्ये केलेल्या एका राजकीय आंदोलनाच्या गुन्ह्यात त्यांना गिरगाव दंडाधिकारी कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र त्याच दिवशी तातडीने मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत बच्चू कडू यांनी ताप्तुरता जामीन मिळवला होता.
त्यानंतर बच्चू कडू यांनी रितसर नियमित जामीनासाठीही अर्ज केला होता. ज्यावर सुनावणी घेत न्यायाधीश राहुल रोकडे यांनी २१ सप्टेंबर रोजी या प्रकरणात कडू यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यासह तितक्याच रकमेच्या हमीदारावर जामीन मंजूर केला. तसंच तपासयंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देत कोणत्याही साक्षी पुराव्यांशी छेडछाड न करण्याचे आदेशही दिले होते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….