मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची 23 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल (वय-57) यांनी राहत्या इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (गुरुवार) सकाळी घडली आहे.
व्यवसायात झालेल्या आर्थिक तोट्यातून पारस पोरवाल यांनी आत्महत्या (Builder Paras Porwal Suicide) केली. या घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलीस ठाण्याचे (Kalachowki Police Station) पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भायखळा येथे गुरुवारी सकाळी ही आत्महत्येची घटना घडली आहे. पारस पोरवाल यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. यात पोलिसांना पोरवाल यांनी लिहिलेली एक सुसाइड नोट (Suicide Note) सापडली आहे. त्यानुसार पोरवाल यांनी व्यवसायात झालेल्या आर्थिक तोट्यातून जीवन संपविण्याचे हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.
पारस पोरवाल यांनी इमारतीच्या टेरेस वरुन उडी मारुन आत्महत्या केली.
त्यांच्या जिमच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये,
कोणाचीही चौकशी करु नये, असे लिहिलेले आहे. नातेवाईकांनी त्यांचे अक्षर ओळखले आहे. त्यांचाही कुणावर संशय नसल्याचे नातावेईकांनी पोलिसांना सांगितले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….