उद्धव ठाकरेंच्या खेळीने संजय राठोडांची अडचण वाढली, आगामी निवडणूक जड जाणार….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याच्या राजकारणात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील रस्सीखेच सुरुच आहे.
दोन्ही गट एकमेकांना शह देण्यासाठी निमित्त शोधत असतात. शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Raothod) यांना धक्का देण्यास ठाकरे गट सज्ज झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील संजय राठोड यांच्या मतदार संघातील माजी मंत्री संजय देशमुख यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
संजय राठोड यांचे निकटवर्तीय असलेले महंत यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आज संजय देशमुख यांनी आज शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
कोण आहेत संजय देशमुख….?
संजय देशमुख हे माजी शिवसैनिक आहेत. ते यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघातून १९९९ आणि २००४ अशा सलग दोन टर्ममध्ये अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांच्यासोबत यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
पक्षप्रवेशानंतर संजय देशमुख यांनी म्हटलं की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात करत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत नक्की चमत्कार पाहायला मिळेल. ज्या पक्षाने मला मोठं केलं त्या पक्षाची परिस्थिती पाहता त्यांना मदत म्हणून मी हा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना मी माझ्या आईला देखील विचारलं ज्या पक्षाने मोठे केलं त्यांच्यासोबत असणं गरजेचं आहे असं आई देखील म्हणाली. संजय राठोड यांनी गेल्या वीस वर्षात बंजारा समाजासाठी काही केलेलं नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….