लाखो शेतकऱ्यांना मिळणार दिवाळी भेट, या दिवशी खात्यात येणार 12 वा हप्ता…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- दिवाळीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लाखो शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहेत. 17 ऑक्टोबर रोजी ते पीएम किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता जारी करतील.
जे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत, त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही. ते वगळता इतर शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम थेट पोहोचेल.
अपात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही
माहितीनुसार, किसान सन्मान निधी (12th installment of PM Kisan Samman Nidhi Yojana) चा 12 वा हप्ता सप्टेंबरमध्येच रिलीज होणार होता. मात्र पात्र शेतकऱ्यांची पडताळणी आणि ई-केवायसी यामुळे विलंब झाला. आता सरकारने या योजनेतून अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना वेगळे केले आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना (Farmers) ही रक्कम मिळणार नाही. एकट्या उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) 21 लाख शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत, त्यामुळे यावेळी ही रक्कम त्यांच्या खात्यात येणार नाही. अशा शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून आधीच पाठवलेली रक्कमही परत मागितली जात आहे.
PM मोदी 17 ऑक्टोबरला रिलीज होणार
पडताळणीनंतर, सरकारने पीएम किसान पोर्टलवर पात्र आढळलेल्या सर्व शेतकऱ्यांचे डिटेल अपलोड केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 17 ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमात एक बटण दाबून ही करोडो रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहेत. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2-2 हजार रुपये पोहोचतील. यावेळी सरकारने योजनेच्या 12व्या हप्त्याची (12th installment of PM Kisan Samman Nidhi Yojana) रक्कम जारी करण्यापूर्वी स्टेटस तपासण्यासाठी नियम बदलला आहे.
मोबाईल क्रमांकावरुन स्थिती तपासता येते
या योजनेत पूर्वी लाभार्थी शेतकरी पीएम किसान पोर्टलला भेट देऊन त्यांच्या मोबाईल क्रमांक किंवा आधार कार्डद्वारे स्टेटस पाहू शकत होते. यानंतर, सरकारने हा नियम लागू केला की केवळ आधार कार्डद्वारे उमेदवारांना त्यांचे स्टेटस तपासता येईल. आता पुन्हा एकदा नियमात बदल करण्यात आला असून केवळ त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुनच लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांचे स्टेटस पाहता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आता आधारद्वारे स्टेटस पाहणे शक्य होणार नाही. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एका वर्षात शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिले जातात. 2-2 हजार रुपये करुन ही रक्कम 3 पटीने दिली जाते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….