ठाकरेंच्या अडचणी संपता संपेनात! मशाल चिन्हावरही समता पार्टीचा दावा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या उद्धव ठाकरे यांच्या पक्षासमोरी अडचणी वाढतंच चालल्या आहेत. अंधेरी पोटनिवडणूक तोंडावर आली असतानाच ठाकरे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने बहाल केलेल्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने दावा केला आहे.
हे चिन्ह आमचे असल्याचा दावा समता पार्टीच्या नेत्यांनी केल्यामुळे ठाकरेंच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.
दरम्यान, १९९६ पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचं सांगत समता पार्टीने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. यावर आज निर्णय अपेक्षित असून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उमेदवार देणार असल्याची घोषणाही समता पार्टीने केली आहे. “२००४ मध्ये समता पक्षाची राज्य पक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचं सांगत निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह बहाल केलं” अशी प्रतिक्रिया समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी दिली आहे. याप्रकरणी आपण निवडणूक आयोगाला इमेल पाठवून चिन्हावर हक्क सांगितला असल्याचं त्यांनी सांगितलं.
ठाकरे गटाच्या उमेदवाराची उमेदवारी अडचणीत
अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण त्यांचा महानगरपालिका कर्मचारी पदाचा राजीनामा अद्याप मान्य न झाल्याने त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. तर शिंदे गटाकडून लटके यांना आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्यावर आयोगाने सेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. त्यानंतर दोन्ही गटाला वेगळे चिन्ह बहाल करण्यात आले होते. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह आणि ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव देण्यात आले आहे. तर एकनाथ शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह आणि ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर पुन्हा अडचणी निर्माण झाल्या आहेत

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….