मुलायमसिंह यादव यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लखनऊ :- उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या पार्थिवावर 11 ऑक्टोबर (मंगळवार) रोजी सैफई येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
नेताजींच्या पार्थिवाच्या अंत्यसंस्कारासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मुलायमसिंह यादव यांच्या मूळ गावी सैफईमध्ये त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे.
सैफई गावात पोहोचलेले जिल्हा दंडाधिकारी अवनीश कुमार राय आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक जय प्रकाश सिंह यांनी मुलायमसिंह यादव यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे पार्थिव सैफई येथे आणले जात असल्याचे जिल्हा दंडाधिकारी अवनीश कुमार राय यांनी सांगितले. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास शासकीय इतमामाने अंत्यसंस्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार प्रशासनाने सैफईतील तयारीचा आढावा घेऊन तयारी सुरू केली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….