ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे, काय मिळणार नाव आणि चिन्ह…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- निवडणूक आगोयाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांना नाव आणि चिन्हासाठी तीन पर्याय सुचवण्याचे आदेश दिले होते. आज दुपारी १ वाजेपर्यंत हे तीन पर्याय निवडणूक आयोगासमोर सादर करायचे आहेत.
त्यानुसार, आज दुपारपर्यंतपक्ष नाव आणि चिन्हाबाबतचा फैसला होणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाने तीन पर्याय सादर केले असून शिंदे गटाने अद्यापही सादर केलेली नाहीत. त्यामुळे शिंदे गट कोणते तीन पर्याय सुचवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
चिन्हासाठी त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल असे पर्याय ठाकरेंनी सुचवले असून नावासाठी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (प्रबोधनकार ठाकरे), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे तीन पर्याय देण्यात आल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. काल सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमावरून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली.
‘वर्षा’ बंगल्यावर कायदेतज्ज्ञ, जाणकारांसोबत मंथन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. रविवारी ते याबाबत आपल्या भावना सर्वांसमोर जाहीर करतील अशी आशा सर्वांना होती. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. कायदेतज्ज्ञ, राजकीय जाणकार, मंत्री, नेते आणि पदाधिकार्यांसोबत चर्चा करत याबाबत त्यांनी मंथन केल्याचे समजते. ‘शिवसेना’ हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह जर वापरता येत नसेल, तर मग यासाठी आपल्याकडे कोणते पर्याय उपलब्ध असतील, याचा आढावा त्यांनी या बैठकांद्वारे घेतल्याचे समजते. कायदेतज्ज्ञ, राजकीय जाणकार, मंत्री नेते आणि पदाधिकारी यांच्या सल्ल्यानुसारच पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आहे.
मातोश्रीवरही खलबतं
शनिवारी निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर तत्काळ मातोश्रीवर खलबतं सुरू झाली. मातोश्रीवर अनेक नेत्यांनी उपस्थित राहून विचारमंथन केलं. त्यातूनच त्यांनी तीन पक्ष आणि चिन्हांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….