विधानसभेवर भाजप, शिंदेंच्या शिवसेनेचाच भगवा फडकणार :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- राज्यात आगामी काळात विधानसभेवर भगवा हा फडकणार असून तो भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या खऱ्या शिवसेनेचाच असेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर मी बोलणार नाही, कारण शिंमग्यावर बोलायचे नसते असा टोलाही फडणवीसांनी लगावला. बालेवाडी येथे कृषी विभागाने आयोजित केलेल्या नैसर्गिक शेती राज्यस्तरीय परिषद 2022 च्या कार्यक्रमासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हे उपस्थित होते.
शिवसेना फुटीचे कारणच मुळ विचार बाजूला ठेवून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत ते गेले आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आम्हाला कायदा शिकवू नये असेही एका प्रश्नांच्या उत्तरात स्पष्ट केले. मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे हे पक्ष प्रमुखांचेच भाषण करीत असत, म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो. कारण ते सरकारच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलले. राज्याच्या कानाकोपऱ्यातुन लोक शिंदे यांच्या दसरा मेळाव्यास आले होते. त्यांच्या मेळाव्यास झालेली गर्दीनेच खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी बोलताना केला.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….