आज दोन खासदारांसह पाच आमदार शिंदे गटात प्रवेश करणार…? ; खासदार कृपाल तुमानेंचा दावा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण शिवसेनेच्या (Shivsena) इतिहासात पहिल्यांच दोन दसरा मेळावे होते आहे.
शिवसेनेत पडलेल्या अभूतपूर्व फूटीनंतर आज शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) होणार आहे. दरम्यान, यापूर्वीच शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने (MP Krupal Tumane) यांनी ठाकरेंना धक्का देणारा दावा केला आहे. बीकेसी (BKC) मैदानावर होणाऱ्या शिंदे गटाच्या मेळाव्यात आज आणखी दोन खासदार आणि पाच आमदार शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. त्यामुळं ते दोन खासदार आणि पाच आमदार कोणते अशी राजकीय वर्तळात चर्चा सुरु आहे.
एक खासदार मुंबईचा आणि एक मराठवाड्याचा, तुमानेंचा दावा
दरम्यान, नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी हजेरी लावली. त्यानंतर कृपाल तुमाने यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आज आणखी दोन खासदार आणि पाच आमदार शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा केला आहे. हा दावा ठाकरेंनीसाठी धक्कादायक मानला जात आहे. कारण आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे 40 आमदार आले आहेत. पुन्हा आणखी जर पाच आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला तर हा ठाकरेंसाठी मोठा धक्का असणार आहे. आज प्रवेश करणाऱ्या दोन पैकी एक खासदार मुंबईचा आणि एक मराठवाड्याचा असू शकतो. एक प्रभावी खासदार आज शिंदे गटात प्रवेश करु शकतो असे तुमाने यांनी म्हटलं आहे. त्याशिवाय पाच आमदार शिंदे गटात येतील असा दावा देखीलतुमाने यांनी केला आहे.
बाळासाहेबांचा विचार घेऊन समोर जाणारी शिवसेना आमची
मोठ्या संख्येने शिवसेनेचे लोकप्रतिनिधी शिंदे गटात आधीच आले आहे. त्यामुळं हीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटानं केला आहे. बाळासाहेबांचा विचार घेऊन समोर जाणारी शिवसेना आहे. ज्यांनी शिवसेनेला सदैव शिव्या दिल्या आम्ही त्यांच्यासोबत गेलो नाही. शिवसेनेच्या दुर्देशेला आम्ही जबाबदार नाही असे देखील तुमानेंनी म्हटलं आहे. शिंदे यांच्यासोबत राज्यातील 50 आमदार आणि 12 खासदार आले आहेत. जनता शिंदे साहेबांच्या सोबत असल्याचे तुमाने म्हणाले. आमचीच शिवसेना खरी शिवसेना आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊस जनतेसमोर जात असल्याचे तुमाने म्हणाले. कोणते खासदार आणि आमदार शिंदे गटात जाणार याबाबत तुमानेंना विचारल्यावर ते म्हणाले की, यामध्ये एक मराठवाड्यातील खासदार आणि एक मुंबईतील खासदार असू शकतो असे तुमानेंनी सांगितले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….