अशोक गेहलोतच राहणार राजस्थानचे मुख्यमंत्री ; तूर्तास राज्यात निरीक्षक जाणार नाहीत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- राजस्थानात सध्या तरी मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत.
काँग्रेस नेतृत्वाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना तसे संकेत दिले आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे की, सध्या कोणीही निरीक्षक आमदारांचे मत घेण्यासाठी जयपूरला पाठविण्यात येणार नाहीत.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन ज्या दिवशी माफी मागितली होती त्यानंतर काही तासांतच संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी असे विधान केले होते की, राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय सोनिया गांधी दोन दिवसांत घेतील. आता सोनिया गांधी यांनीच राजस्थानचे सरचिटणीस प्रभारी अजय माकन यांना निर्देश दिले आहेत की, राज्यातील पूर्ण प्रकरण शांत करण्यात यावे. आमदारांमध्ये हा संदेश द्यायचा आहे की, कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. यामागचे कारण असे आहे की, काँग्रेस नेतृत्वाला याबाबत असा अहवाल मिळाला आहे की, जर अशोक गेहलोत यांना हटविण्याचा प्रयत्न झाला तर तेथील सरकार पडू शकते.
पंजाबमधील पराभवासाठी काँग्रेस नेतृत्वाला जबाबदार ठरविण्यात येत होते. यावेळी राजस्थानातील सरकार पडण्याचा आरोप सोनिया गांधी या स्वत:वर येऊ देऊ इच्छित नाहीत.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….