एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात, आजचे दर पाहा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Rate) दरात बदल झाला आहे.
नवे इंधन दर जारी झाले असून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial Gas Cylinder) दरात कपात करण्यात आली आहे, मात्र घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सलग सहाव्या महिन्यात घट झाली आहे. दरम्यान नैसर्गिक वायूच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात घट
आजपासून व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत घट झाली असून आजपासून 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मुंबईमध्ये 32.50 रुपये, दिल्लीमध्ये 25.50 रुपये, कोलकातामध्ये 36.5 रुपये तर चेन्नईमध्ये 35.5 रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे मुंबईमध्ये आता व्यावसायिक सिलेंडरचा दर 1811.50 रुपये किमतीला मिळेल. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नसून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर त्याच दरात मिळतील.
घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर ‘जैसे थे’
व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सलग सहा महिने कपात करण्यात आली आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मे महिन्यात व्यावसायिक सिलेंडरचे दर 2354 रुपयांपर्यंत पोहोचले होता. मुंबईमध्ये आता व्यावसायिक सिलेंडरचा दर 1811.50 रुपये इतका असेल. देशाची राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा दर 25.50 रुपयांनी कमी झाल्याने 1859.50 रुपये किमतीला असेल. कोलकातामध्ये गॅस सिलेंडरचा दर 1959 रुपये तर चेन्नईमध्ये 2009 रुपये झाला आहे.
नैसर्गिक वायूच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ
जागतिक बाजारात शुक्रवारी नैसर्गिक वायूच्या किमतीत विक्रमी 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वीजनिर्मिती, खतनिर्मिती आणि वाहने चालवण्यासाठी वापरण्यात येणारा गॅस महाग होण्याची शक्यता आहे. वायू क्षेत्रातून तयार होणाऱ्या गॅससाठी द्यावा लागणारा दर 8.57 प्रति दशलक्ष डॉलरपर्यंत वाढवण्यात आला आहे. हा दर आधी 6.1 प्रति दशलक्ष डॉलर ब्रिटिश थर्मल युनिट (MBTU) होता.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…