प्रतीक्षा संपली! 5G इंटरनेट सेवेचा मोदींच्या हस्ते शुभारंभ ; ‘या’ शहरात वापरता येणार सेवा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा ही वेगवान पद्धतीनं सुरु होणार आहे. देशात 5G सेवा सुरु होत असून पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) हस्ते आज इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात 5 जी इंटरनेट सेवा लाँच करण्यात आली.
रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्या स्पर्धेत आहेत. आता कोणती कंपनी 5G इंटरनेटची सुरुवात करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

मोदींच्या हस्ते 5G सेवेचं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5G सेवेचं नुकतचं उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधानांसह दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव, दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी हेही उपस्थित होते.
महाराष्ट्रात दोन प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरु केली जाणार
महाराष्ट्रात दोन प्रमुख शहरांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात 5G सेवा सुरु केली जाईल. त्यात मुंबई आणि पुणे या दोन शहरांचा समावेश आहे. यासोबत दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, बंगळुरु, चंदीगड, गांधीनगर, हैदराबाद, जामनगर, लखनौ या शहरांमध्येही 5G सेवा सुरु केली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…