एकनाथ शिंदेंना संघटना, चिन्ह चालते मग शिवसेनाप्रमुखांचा मुलगा आणि नातू का चालत नाही…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खालच्या पातळीवर जाऊन असंस्कृत राजकारण करीत आहेत. त्यांना शिवसेनाप्रमुखांचे नाव चालते, संघटना, चिन्ह चालते, तर मग त्यांचा मुलगा आणि नातू का चालत नाही, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
आमदार निलेश लंके यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या हयातीत उद्धव ठाकरे यांना आपले उत्तराधिकारी म्हणून नेमले. शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत दहा वर्षे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सांभाळली. असे असताना त्यांच्याकडून पक्ष संघटना, संघटनेचे नाव, शिवसेनाप्रमुखांचे नाव, पक्षचिन्ह ओरबाडण्याचा प्रयत्न करणे हे एकनाथ शिंदे आणि बंडखोर गटाच्या असंस्कृतपणाचे लक्षण आहे. संविधानाशी फारकत घेऊन ते वागत आहेत.
इतर पक्षांतून भाजपात गेलेले ‘आम्ही आता चिंतामुक्त झालो असून, आता निवांत झोप येते’ असे सांगत आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांची भाजप आता राहिलेली नाही. आता संविधान पायदळी तुडवून आम्ही म्हणतो तेच खरे असे म्हणणाऱया लोकांची भारतीय जनता लाँड्री अस्तित्वात आल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या….

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….