देशातील महत्त्वाच्या ‘या’ विमानतळाला आता शहीद भगतसिंग यांचं नाव, ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’च्या ९३ व्या भागात देशवासीयांना संबोधित केले. यावेळी मोदी यांनी योग, खेळ, शिक्षण, भारतातील विविधता, पर्यटन, पर्यावरण अशा विषयांवर भाष्य केले.
त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचाही उल्लेख केला. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी देशातील एक महत्त्वाच्या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव दिले जाईल, अशी घोषणा केली.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये २८ सप्टेंबर हा विशेष दिवस आहे. या दिवशी आपण थोर देशभक्त शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करू. भगतसिंग यांच्या जयंतीच्या अगोदर भारत सरकारने त्यांना श्रद्धांजली म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चंदीगड विमानतळाचे नाव बदलून या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव दिले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
पुढे बोलताना त्यांनी योगविद्येवर भाष्य केले. शारीरिक आणि मानकसिक स्वास्थ्यासाठी योगा खूप महत्त्वाचे आहे, हे संपूर्ण जगाने स्वीकारले आहे. मधुमेह आणि रक्तदाबाच्या अडचणींवर मात करण्यासाठी योग खूप फायदेशीर ठरतो. योगाचे हेच महत्त्व ओळखून संयुक्त राष्ट्राने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवलेले आहे, असे मोदी म्हणाले.
आपल्या देशात सध्या उत्सवांचे पर्व आहे. उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या नऊ दिवसांत आपण उपवास करतो तसेच काही नियम पाळतो. नवरात्रीनंतर विजयादशमी साजरी केली जाईल. या सणांमध्ये भक्तीभाव आध्यात्मिकतेसोबतच अनेक संदेश असतात, असेही मोदी म्हणाले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…