आई पद्मावती मोहनलाल पुरोहित यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना साड्या वाटप – पुत्र रितेश पुरोहित यांचा समाजासमोर नवा आदर्श
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
तालुक्यातील खड़का हे गाव आदर्श गाव म्हणुन जिल्ह्यातच सुप्रसिद्ध आहे. याच गावचे भूमिपुत्र तथा पॉलिटिक्स स्पेशलचे मुख्य संपादक रितेश पुरोहित यांनी आपल्या मातोश्रीचा वाढदिवस अगळावेगळा साजरा केला आहे. त्यांच्या मातोश्री पद्मावती मोहनलाल पुरोहीत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खड़का येथील तब्बल ७५ महिलांना काल साड्या वाटप केल्या आहेत. गावातील महिलांनी आई पद्मावती पुरोहित यांना वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा देत दीर्घ आयुष्याची प्रार्थना केली आहे.

पॉलिटिक्स स्पेशल चे मुख्य संपादक रितेश पुरहित नेहमी अनोख्या उपक्रमाने खडका वासियांसाठी समाजसेवा करीत असतात.मागील वर्षी आलेल्या आस्मानी संकट आणि मान्सूनचा सुलतानी कारभाराने अनेकांच्या घरावरील टिन पत्रे उडाली.त्यांच्या मदतीसाठी त्यांनी गावातील गरजुवंत नागरिकांना टिन पत्रे वाटप केली होती.त्यांनी पुन्हा नव्याने महिलांना साड्या वाटप केल्या आहेत.

यावेळी पॉलिटिक्स स्पेशल चे मुख्य संपादक रितेश पुरोहित ,
बाबासाहेब नाईक सूतगिरणी चे संचालक डॉ.राजेंद्र पुरोहित , सरपंच संदीप कानडे , महागाव तालुका जिनिंग प्रेसिंग चे संचालक दत्तराव कदम , डॉ.संदीप शिंदे , विलास पाटील शिंदे , रज्जाक भाई ठेकेदार, संजय वाघमारे, विलास देशमुख, दशरथ मारटकर, अनिल कांबळे,ह्यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संदीप शिंदे तर आभार दत्तराव कदम यांनी मानले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…