मुख्यमंत्री शिंदे कडून संभाजीराजेंची दिलगिरी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी मंत्रालयात आलेल्या छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने व्यक्त केलेल्या नाराजीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त करीत संभाजीराजे यांना सन्मानाने भेटीसाठी बोलावले.
मराठा समाजाच्या नोकरीतील आरक्षणाच्या प्रश्नासह अन्य काही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे गुरुवारी मंत्रालयात आले होते. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेतल्यावर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाकडे गेले.
मात्र, मुख्यमंत्र्यांची अन्य बैठक सुरु असल्याने लगेच भेट होऊ शकत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे ताटकळलेले संभाजीराजे नाराज होऊन निघून गेले. मुख्यमंत्र्यांना पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ आहे. मात्र, समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या संभाजीराजे छत्रपतींना भेटण्यास वेळ नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः संभाजीराजे यांना दूरध्वनी करून बोलावले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….