“राज्यात सरकार हे जनतेचे सरकार” ; चारशे निर्णय घेतले :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात जनतेचे सरकार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा उभारण्यात आला.
आत्तापर्यंत आम्ही 400 हून अधिक निर्णय घेऊ शकलो. विशेष म्हणजे राज्यात 75 हजार पदांची भरत भरती करत आहे. जी पदे आधीपासूनच मंजूर आहेत ती भरण्यात येत आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद येथे दिली.
हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. आत्तापर्यंत आम्ही 400 हून अधिक निर्णय घेऊ शकलो. विशेष म्हणजे राज्यात 75 हजार पदांची भरत भरती करत आहे. जी पदे आधीपासूनच मंजूर आहेत ती भरण्यात येत आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद येथे दिली.
शिंदे म्हणाले मी भाग्यवान –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. यावेळी बोलताना मी भाग्यवान असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. उभारण्यात आलेले हे विद्यापीठ ज्ञानदानाचे काम करते आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झालेला आहे. त्या ठिकाणी मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य लाभले असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तर संत पीठाचे काम हे सुरू झालेले आहे. विद्यापीठामार्फत अनेक विषयाचे ज्ञान दिले जाते. ज्ञानदानाचे केंद्र असल्याने आम्ही नेहमी विद्यापीठासोबत राहू, लवकरच संतपीठासाठी पैसे देणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
महाराजांनीच मांडली होती मंत्रिमंडळाची संकल्पना –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि हा पूर्ण परिसर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे. शिक्षणाचा हा आता मोठा वटवृक्ष झालाय. याच आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याचा मला आनंद आहे. खरंतर त्याकाळी अष्टप्रधान मंडळ म्हणजेच मंत्रिमंडळाची संकल्पना ही महाराजांनीच पुढे आणली आणि त्याच आधारावर आता पुढे काम सुरू आहे. महाराजांमध्ये एक वेगळी दैवी शक्ती होती. बहुआयामी असं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळेच नौदलात विक्रांत दाखल झाली, त्यावेळी ध्वजावर राजमुद्रेला स्थान देण्यात आले आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हा विद्यापीठ परिसराचा सौंदर्य वाढवणार आहे. एक वेगळा इतिहास या निमित्ताने उभा राहील. विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी प्रेरणा स्त्रोत म्हणून या पुतळ्याकडे पाहिले जाईल. या ठिकाणचे पावित्र्य राखले जाईल असा विश्वास असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…