राज्याला वादळी पाऊस झोडपणार ; या भागांना ऑरेंज अलर्ट जारी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील बहुतांश भागात रविवारी अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. येत्या काही दिवसात राज्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. राज्यात आगामी 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भात जोरदार पावसाच्या इशाऱ्यासह येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच राज्यातीस इतर भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई आणि ठाणेसह नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाने पुन्हा एकदा धुमाकुळ घालायला सुरूवात केली आहे. पुढचे पाच दिवस राज्याला वादळी पाऊस झोडपणार असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…